पनवेलमध्ये 33 महिला होणार सरपंच

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

इच्छुकांच्या आशेवर पाणी

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या अध्यक्षतेखाली फडके नाट्यगृहात 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

यामध्ये 33 जागांवर महिला सरपंच विराजमान होणार असल्याने निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या पुरुष उमेदवारांना फटका बसल्याचे बोलले जात आहे. पळस्पे, शिवकर सारख्या पंचायतीचे राजकारण या घडामोडीमुळे बदलणार आहे. आरक्षणामध्ये अनुसूचित जातीसाठी नेरे आणि करंजाडे, अनुसूचित जाती (महिला) करिता सावळे, अनुसूचित जमातीसाठी नानोशी, आपटा, कर्नाळा, पोसरी, बारवई या ग्रामपंचायतीवर आरक्षण असणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गात सर्वाधिक 20 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामध्ये कुंडेवहाळ, चिपळे, वहाळ, गिरवले, गुळसुंदे, खानाव, साई, देवद, वलप, नांदगाव, कोळखे, कराडेखुर्द, कसळखंड, सोमटणे, उमरोली, दिघाटी, उसीखुर्द, देवळोली, वांवजे, नितळस या ग्रामपंचायती आहेत. सर्वसाधारण (महिला) प्रवर्गात उलवा, केवाळे, पालीदेवद, भाताण, तरघर, वावेघर, चिखले, पारगाव, पालेबुद्रक, खेरणेखुर्द, जांभिवली, पोयजे, न्हावे, शिरढोण, वारदोली, पळस्पे, विचुंबे, केळवणे या 18 ग्रामपंचायतीचा समावेश. अनुसूचित जमाती (महिला) साठी मालडुंगे, खैरवाडी, शिरवली, कानपोली, वाजे, गव्हाण या सहा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ओवळे, कोन, वाकडी, खानावळे, शिवकर, चिंध्रण, आदई, भिंगार, मोर्बे यांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी दापोली, दुंदरे, वाघीवली, तुराडे, चावणे, आकुर्ली, वडघर, हरिग्राम, सांगुर्ली, वागणी तर्फे वाजे 9 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Exit mobile version