रायगड जिल्ह्यात 335 नवे कोरोना रुग्ण

6 जणांचा मृत्यू तर 356 झाले कोरोनामुक्त
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज रविवार दिनांक 25 जुलै रोजी नव्याने 335 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 356 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
रविवारी वारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 117 , पनवेल ग्रामीण 32, उरण 14, खालापूर 23, कर्जत 4, पेण 24, अलिबाग 56, मुरुड 6, माणगाव 32, रोहा 10, श्रीवर्धन 10, सुधागड 6, म्हसळा 1, तर महाड, तळा, पोलदपूर या तीन तालुक्यात एक ही नविन रुग्ण आढळला नाही.
तसेच अलिबाग तालुक्यात चार, रोहा, श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 6 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 58 हजार 664 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 50 हजार 828 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 3 हजार 912 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 3 हजार 924 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version