अलिबाग तालुक्यासाठी दोन महिन्यात 35 कोटींचा निधी

आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन
पंडित पाटील यांच्या वाढदिवशी शिवस्मारकाचे लोकार्पण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दोन महिन्यात आपण 35 कोटी रुपये आपल्या तालुक्यात आणण्यात यशस्वी झालो. सगळयात महत्वाचा रस्ता बैलखिंड पेझारीपासून नागावपर्यंत रस्ता नेण्याचा प्रयत्न आहे. साताड बंदर पर्यंत हा रस्ता नेण्याचा प्रयत्न आहे. गाडी येणारे पर्यटक ताडवागळे येथून नागावपर्यंत पोहचतील. त्यामुळे ताडवागळे, बांधण, पेझारी नाका येथे मोठा उद्योग तयार होणार आहे. आदिवासी आपल्या वाडयामध्ये देखील पर्यटन येऊन रोजगार वाढेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. अलिबाग तालुका पर्यटन हब करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आंबेपूर ग्रामपंचायतीच्या वतीने शिवस्मारकाचे लोकार्पण शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी अध्यक्ष अ‍ॅड आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, अरविंद महाराज, खालापूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संतोष जंगम, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, माजी जिप सदस्य नंदकुमार म्हात्रे, अ‍ॅड राजन पाटील, अ‍ॅड निता पाटील, आंबेपुरच्या सरपंच सुमन पाटील, युवानेते सवाई पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड मानसी म्हात्रे, अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी सभापती जनार्दन तथा बाळूशेट पाटील, प्रमोद ठाकूर, सुधीर थळे, विपुल खाटकवर, पंचायत समिती सदस्य रचना पाटील, आंबेपुर उपसरपंच ममता पाटील आदी उपस्थित होते.

शिवपालखीची सवाद्य मिरवणूक
सुरुवातीला पेझारी येथून शिवपालखीची मिरवणूक कुलाबा ढोल पथकाच्या जल्लोषात काढण्यात आली. त्यानंतर ना ना पाटील विद्यालयाच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातील संस्कार सचिन पाटील या बालकाने शिवाजी महाराजांच्या चरित्रावर वीरश्रीने भारलेले वक्तृत्व सादर करुन वाहवा मिळवली. तसेच चित्रा पाटील यांना नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड 2022 हा अतिशय प्रतिष्ठेचा सामाजिक कार्याकरीता देण्यात येणार्‍या पुरस्काराबाबत आ. जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

आ. जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्व. प्रभाकर पाटील यांनीं जिल्ह्यात पोयनाडमध्ये सर्वप्रथम शिवाजी महाराजांची जयंती मोठया दिमाखात सुरु केली होती. या कार्यक्रमाला महाराष्ट्राती प्रभावित वक्ते प्रभाकर पाटील बोलवत. यात प्रबोधनकार ठाकरे, कॉ डांगे, आचार्य अत्रे यांची भाषणे ऐकायला मिळत असे. आंबेपूर ग्रामपंचायतीने उभारण्यात आलेल्या शिवस्मारकात आरमारी सज्जता दाखवून अलिबागचा इतिहास दाखविल्याबाबत कौतुक केले. कोळी समाजाचा स्वराज्यातील सहभाग नवीन पिढीला इतिहास समजला पाहिजे. काळ बदललेला आहे.

महाराष्ट्र दिन कामगार दिन
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईतील कामगारांनी खरी गती दिली म्हणूनच महाराष्ट्र एकसंघ होऊ शकला. खारेपाटातील बरेचसे कामगार सांबरीपासून रेवसपर्यंत मुंबईत गिरणी कामगार म्हणून कार्यरत होते. या ठिकाणचे राजकारण तेजस्वी रहिले. शेतकरी चळवळी नंतर वेगळी भुमीका पसरली. शेकापक्षाने सुरुवातीला दोन ग्रामपंचायतीच्या जोरावर दत्ता पाटील आमदार झाले. वेगळया पद्धतीने काम केले तर ग्रामपंचायतीचा विकास होऊ शकतो. दोन महिन्यात आपण 35 कोटी रुपये आपल्या तालुक्यात आणण्यात यशस्वी झालो. सगळयात महत्वाचा रस्ता बैलखिंड पेझारीपासून नागावपर्यंत रस्ता नेण्याचा प्रयत्न आहे. साताड बंदर पर्यंत हा रस्ता नेण्याचा प्रयत्न आहे. गाडी येणारे पर्यटक ताडवागळे येथून नागावपर्यंत पोहचतील. त्यामुळे ताडवागळे, बांधण, पेझारी नाका येथे मोठा उद्योग तयार होणार आहे. आदीवासी आपल्या वाडयामध्ये देखील पर्यटन येऊन रोजगार वाढेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. किनारपट्टीप्रमाणे आदीवासी पट्टीमध्ये देखील आले पाहिजेत असा प्रयत्न राहणार आहे. साडेपाच कोटी या भागासाठी आणले असून बेलोशीपर्यंत हा रस्ता नेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. इतिहास माहित नसल्याने नविन पिढीने जुन्या मंडळींना विसरता कामा नये. त्यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे. पोयनाड गावातील रस्ता चांगला दर्जेदार झाला आहे. गल्ली बोलात देखील चांगला रस्ता करण्याचा प्रयत्न आहे.

विधीमंडळात अभ्यासपूर्ण बोलले तर निधीची कमतरता येत नाही. पंडितशेठनी माझ्याहून चांगले काम केले. मीनाक्षीताईंचे काम आणखी वेगळया पद्धतीचे होते. आपली आमदारकी गेल्याने आपला मतदारसंघ दहा वर्षे मागे गेलेला आहे. तालुक्यात जो निधी येतो तो आपल्या ज्येष्ठतेमुळे फुटपट्टीने होतो आहे. त्याचा पुरेपूर वापर आपण करीत आहोत. बोडणीला मोठे बंदर आपण करीत आहोत. कालच त्याला मंजुरी मिळालेली आहे. आ.जयंत पाटील पुढे म्हणाले की, दहा कोटीची जेटी आपण बनवतो आहोत. त्याचप्रमाणे 700 ते 800 कोटीच्या जेटीचे विस्तारीकरण करण्याचा आपले नियोजन आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी निधी आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मांडवा जेटी, काशिद जेटी यासाठी नितीन गडकरी यांनी आपल्या प्रयत्नांमुळे निधी दिला. अलिबाग तालुका पर्यटन हब करण्याचा प्रयत्न करत आहोत. नवीन पिढीने आपली बांधीलकी जोपासली पाहिजे. शेतकरी कष्टकरी कामगारासोबतची बांधीलकी पुढे देखील कायम ठेवली पाहिजे. नाना पाटील यांच्या संपूर्ण चळवळीचे स्मारक मीनाक्षी पाटील यांनी मंजुर करुन घेतले आहे. त्यासाठी जागा बदलून चरीला स्मारक करुन पर्यटक वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नवगाव इस्त्रायल स्मारकाचाही विकास आपण करीत आहोत.

आपल्याला फसवणार्‍याला नेस्तनाबुत केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही प्रभाकर पाटील यांची मुले आहोत. त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. – आ.जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस

युवानेते सवाई पाटील यांनी प्रस्तावना करताना इतिहासाला उजाळा दिला. तसेच शेतकरी कामगार पक्ष हा शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष असल्याचे सांगितले. शिवरायांच्या गनिमी काव्यानेच दोन मते असताना देखील आ. जयंत पाटील सर्वाधिक मतं घेऊन निवडून आले. शिवरायांची प्रेरणा घेऊनच पुन्हा एकदा शिवतिर्थावर लाल बावटा फडकवायचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version