35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
हनीट्रॉपच्या माध्यमातून सोशल मीडियावर बदनाम करण्याची धमकी दिल्याने चंदूर येथील शाहूनगर परिसरातील यंत्रमाग कामगाराने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संतोष मनोहर निकम (वय 35) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याच्या मोबाईची पडताळणी केली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. हनीट्रॉपचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version