। तळा । प्रतिनिधी ।
तळा तालुक्यातील मौजे शेणवली येथून 35 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळा तालुक्यातील शेणवली येथील विक्रम विठ्ठल शिवडे (35) हा आपल्या राहत्या घरातून 27 ऑगस्ट रोजी कोणालाही न सांगता निघून गेला. तो परत घरी आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र तो सापडला नसल्याने तो हरवला असल्याची तक्रार तळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर तरुणाची उंची 5 फूट 5 इंच, रंग सावळा, पांढऱ्या रंगाचा फुल हाताचा शर्ट व पॅन्ट, पायात काळ्या रंगाची चप्पल, दोन्ही हातावर व पायावर जुन्या जखमा यांसह सदर तरुण वेडसर असून, त्याला बोलता येत नाही तरी अशा वर्णनाचा तरुण कोणाला आढळल्यास त्याची माहिती 8667104161 या नंबर वर अथवा तळा पोलीस ठाण्यात द्यावी असे आवाहन तळा पोलिसांकडून करण्यात आले आहे.







