38 उमेदवारांची 38 चिन्हे

। जळगाव । प्रतिनिधी ।

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. जळगाव मतदारसंघात 14 उमेदवारांची 14 चिन्हे, तर रावेर मतदारसंघात 24 उमेदवारांची 24 चिन्हे आहेत. ही चिन्हे कशी लक्षात ठेवावीत, असा प्रश्‍न मतदारांसमोर आहे.

एका उमेदवाराची प्रचार फेरी घराकडून गेली, की दुसरी, मग तिसरी, अशा एका पाठोपाठ एक प्रचार फेर्‍या निघत असल्याने मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे. मात्र, एवढे चिन्हे आणि तेही लवकर लक्षात नाहीत. उमेदवारही आवर्जुन मतदार भेटीत आपल्या नावाचा कागद, चिन्ह देऊन अमूक चिन्हाकडे लक्ष द्या, असे सांगत आहेत.

निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली चिन्हे

जळगाव मतदारसंघात
– मशाल, हत्ती, कमळ, सीसीटीव्ही कॅमेरा, सिलिंडर, गळ्याची टाय, आईस्क्रीम, ऑटो रिक्षा, नरसाळे, शिवण यंत्र, ऊस शेतकरी, प्रेशर कुकर, बॅट अशी चिन्हे मिळाली आहेत.

रावेर मतदारसंघात- फळांची टोपली, हॉकी आणि बॉल, कमळ, हत्ती, तुतारी वाजविणारा माणूस, सिलिंडर, गॅस शेगडी, प्रेशर कुकर, संगणक, ऑटो रिक्षा, तुतारी, ट्रक, शिट्टी, ऊस शेतकरी, बॅट, दूरदर्शन, एअर कंडिशनर, कपाट, खाट, पाटी, सफरचंद, बासरी, बेबी वॉकर, जहाज अशी चिन्हे मिळाली आहेत.

Exit mobile version