38 वर्षीय इसम बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

देवद येथे राहणारा 38 वर्षीय रामनाथ सुदाम मेंदारकर हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो असे सांगून बाहेर गेला आणि तो घरी परत ना आल्याने तो हरवला असल्याची तक्रार खान्देश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

त्याची उंची पाच फूट, रंग गोरा, केस काळे आहेत. तो अंगाने मध्यम असून अंगात सफेद रंगाचा चौकडी शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे. त्याची दाढी साधारण वाढलेली असून पायात चॉकलेटी रंगाची सँडल आहे. या इसमाबाबत अधिक माहिती असल्यास सहाय्यक फौजदार सुभाष मिस्त्री यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version