तिसरी ते आठवीची पायाभूत चाचणी परीक्षा

| पुणे | वार्ताहर |

स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मूल्यमापन चाचण्या अशा तीन चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी 17 ते 19 ऑगस्टदरम्यान, तर अन्य चाचण्या ऑक्टोबर आणि एप्रिलमध्ये होणार असल्याचे विद्या प्राधिकरणाने जाहीर केले.

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 2023-24 या शैक्षणिक वर्षात तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या मागील इयत्तेचा अभ्यासक्रम, मुलभूत क्षमता या वर चाचणी आधारित असतील. पायाभूत चाचणीमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 17 ऑगस्टला भाषा विषय, 18 ऑगस्टला गणित आणि 19 ऑगस्टला इंग्रजी विषयाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पहिली संकलित मूल्यमापन चाचणी ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, दुसरी संकलित चाचणी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन आहे.

Exit mobile version