| चिपळूण | प्रतिनिधी |
मोबाईलमधील इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिंक पाठवून येथील तरुणाची सुमारे चार लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम शेट्ये (28) हा मोबाईलवर इन्स्टाग्राम अकाऊंट पाहत असताना शुभमला त्यावर फ्लिप कार्ड कॉमस कमिशन टास्क या नावाची लिंक व फोटो आला. त्यानंतर अज्ञाताने शुभमच्या व्हॉट्सअपवर संपर्क साधून एक नोंदणीसाठी लिंक पाठवली आणि तिच्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सागितले. त्या नंतर विविध टास्कच्या माध्यमातून पैसे मिळतील, असे सांगून शुभम शेट्ये याच्याकडून वेळोवेळी टास्कच्या माध्यमातून 3 लाख 89 हजार 900 रूपयाची फसवणूक केली. हा प्रकार 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.