रायगड जिल्ह्यात 4 हजार 880 उमेदवार रिंगणात

सरपंचपदासाठी 485 व सदस्यपदासाठी तीन हजार 395 उमेदवार

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र बुधवारी माघारीनंतर सायंकाळी स्पष्ट झाले आहे. सरपंचपदाच्या 210 जागांसाठी 485 व सदस्य पदाच्या एक हजार 854 जागांसाठी तीन हजार 395 असे एकूण चार हजार 880 उमेदवार आता रिंगणात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

210 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्ह्यातील तहसील कार्यालयात अर्ज माघार घेण्याची प्रक्रीयाया पार पडली. सकाळी साडेदहा वाजल्यापासून वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती. कोण अर्ज मागे घेणार, कोण रिंगणात राहणार याकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा दुपारी तीन वाजेपर्यंत संपली.

सरपंचपदाच्या 210 जागांसाठी 825 अर्ज, सदस्यपदाच्या एक हजार 854 जागांसाठी चार हजार 716 अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर सरपंचपदाचे 814 व सदस्यपदाचे 4 चार 668 अर्ज शिल्लक राहिले होते. बुधवारी शिल्लक अर्जांवरील माघार घेण्याची प्रक्रीया पार पडली. त्यामध्ये सरपंच पदाचे 329 व सदस्यपदाचे एक हजार 273 अर्ज माघार घेण्यात आले. या प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आता तीन हजार 395 उमेदवार रिंगणात आहेत. पाच नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी अवघे नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत.

निवडणूक कार्यक्रमावर दृष्टीक्षेप
मतदान - 5 नोव्हेंबर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत.
मतमोजणी - 6 नोव्हेंबर रोजी तहसीलदार ठिकाण व वेळ निश्चित करतील.

सदस्यपद निवडणूक

तालुकाएकूण जागाउमेदवार संख्या
अलिबाग1543
मुरुड1538
पेण1125
पनवेल1747
उरण0309
कर्जत0721
खालापूर2261
रोहा1235
सुधागड1329
माणगाव2658
तळा0615
महाड2136
पोलादपूर2239
श्रीवर्धन0813
म्हसळा1216
एकूण210485

सदस्यपद निवडणूक

तालुकाएकूण जागाउमेदवार संख्या
अलिबाग157399
मुरुड145280
पेण111208
पनवेल175360
उरण4181
कर्जत67160
खालापूर202404
रोहा114242
सुधागड111212
माणगाव222335
तळा5057
महाड149214
पोलादपूर162257
श्रीवर्धन6084
म्हसळा88102
एकूण18543395
Exit mobile version