पाणीपुरवठा योजनेसाठी ४० कोटींचा निधी

| कर्जत | प्रतिनिधी |
आ. महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 40 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

तालुक्यातील शेलू बांधीवली पाणीपुरवठा योजनेस 12 कोटी 5 लक्ष 82 हजार 773 रुपये, मोग्रज प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस 13 कोटी 21लक्ष 42 हजार 335 रुपये, आणि पाषाणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी 14 कोटी 37 लक्ष 7 हजार 924 रूपये असा तीन योजनांकरिता सुमारे 39 कोटी 64 लक्ष 36 हजार 32 रुपयांचा निधी प्राप्त केला आहे.

Exit mobile version