महावितरणचा भोंगळ कारभार उघड
| खेड | प्रतिनिधी |
तालुक्यातील खाडीपट्टा विभागात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका 40 गावांतील ग्रामस्थांना बसला. खाडीपट्ट्यातील 40 गाव सलग पाच दिवस अंधारात होती. वीजपुरवठा सुरू करण्याबाबत सातत्याने तक्रारी करूनही 8216; महावितरण 8217; चे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे महावितरणच्या खाडीपट्ट्यातील शाखा अभियंत्याच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
तालुक्यातील विभागातील मूळगाव महावितरणचे उपकेंद्र आहे. लोटे येथून आयनीमार्गे व आमशेत येथून मूळगाव उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो; मात्र कोणतेही कारण नसताना खाडीपट्टयाला होणारा वीजपुरवठा लोटे औद्योगिक वसाहतीला देण्याचे काम शाखा अभियंता बडगुजर यांनी केल्याचा आरोप माजी सरपंच संजय गोळटकर यांनी केला आहे. त्यामुळे 40 गावांतील ग्रामस्थांना सलग पाच दिवस अंधारात राहावे लागले. वीज नसल्याने त्याचा परिणाम नळपाणी योजनाही बंद होत्या. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा खाडीपट्ट्यातील दुकान व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसला आहे.