| कर्जत | प्रतिनिधी |
अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या कडाव येथील शिशुमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून सुमारे 400 राख्या बनविल्या. पाठ्यपुस्तकीय ज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार समजण्यासाठी हा उपक्रम शाळेने राबविला.
इयत्ता 5 वी ते 7 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रथम राख्या बनविण्याचे प्रशिक्षण वर्गशिक्षिका करुणा तांडेल यांनी दिले. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी सुमारे 400 राख्या बनवून आपले कौशल्य दाखविले. विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या राख्या विक्री करण्यासाठी विकण्यासाठी मुख्याध्यापिका अंजली गुरव यांच्या संकल्पनेतून 5 स्टॉल लावण्यात आले. पालकांना व परिसरातील लोकांना विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या खरेदी करण्याचे आवाहन केले गेले. आवाहनाला परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
जवळपास 4500 रुपयांची राख्यांची खरेदीविक्री झाली. उपक्रमास पुष्पा मोहिते,अलका कोशे, अर्चना भोसले, प्रगती कडू. भाग्यश्री म्हात्रे, सोनाली पवार, पुनम गायकर, माया गंगावणे तसेच शिशु मंदिर शाळेचे शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुडे व सर्व पालकवर्गाच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी पार पडला गेला.







