रायगड जिल्ह्यात 418 नवे कोरोना रुग्ण

7 जणांचा मृत्यू तर 400 झाले कोरोनामुक्त
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज बुधवार दिनांक 21 जुलै रोजी नव्याने 418 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 400 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. बुधवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 113 , पनवेल ग्रामीण 41, उरण 15, खालापूर 25, कर्जत 22, पेण 32, अलिबाग 90, मुरुड 8, माणगाव 26, रोहा 16, श्रीवर्धन 2, सुधागड 3, म्हसळा 3, महाड 22 असे एकूण 418 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर तळा आणी पोलाद्पूर या दोन तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

तर खालापूर, पेण, म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एक तर रोहा तालुक्यातील तीन अशा 7 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बरे झाल्याने कोरोनामुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा 72, पनवेल ग्रामीण 42, उरण 15, खालापूर 27, कर्जत 7, पेण 40, अलिबाग 68, मुरुड 4, माणगाव 29, सुधागड 11, रोहा 57, श्रीवर्धन 7, म्हसळा 2, महाड 18, पोलादपूर 1 असे एकूण 400 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 57 हजार 423 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 49 हजार 257 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 3 हजार 873 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 4 हजार 293 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version