| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अझरबैजानहून रशियाला जाणारे विमान प्रवासी विमान कझाकिस्तानमध्ये कोसळून अपघात झाला. या विमानामध्ये विमानात सुमारे 62 प्रवासी आणि पाच क्रू मेंबर असे 67 लोक होते. या दुर्घटनेत 42 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कझाक परिवहन मंत्रालयाने दिली आहे. या अपघातात 25 जण बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे विमान अझरबैजानमधील बाकू येथून रशियातील चेचन्याची राजधानी ग्रोझनी येथे जात होते. पक्ष्यांचा थवा विमानावर आदल्याने विमानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे इमर्जन्सी लँडींग करताना विमान कझाकिस्तानमध्ये कोसळले, अशी माहिती आहे. कझाकस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत सहा जण बचावले आहेत. विमान कंपनीचा हवाला देत अझरबैजानने सांगितले की, अपघाताचे कारण विमान आणि पक्ष्यांची धडक झाल्यामुळे अपघात झाला.