खालापूर नगर पंचायतीच्या 16 जागांसाठी 45 अर्ज, 23 जणांची माघार

। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
खालापूर नगरपंचायतची निवडणूक दि.21 डिसेंबर रोजी होत असून सोमवारी (दि.13) अर्ज मागे घेण्याची तारिख होती. यावेळी प्राप्त झालेल्या एकूण 68 अर्जाांपैकी 23 जणांनी माघार घेतली असून 45 उमेदवार 16 जागेसाठी रिंगणात आहेत.खालापूर नगरपंचायतीची रणधुमाळी सुरु झाली असून या निवडणूकिला आता रंग चढत आहे.

या निवडणुकीत एकूण 45 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणूकित शेतकरी कामगार पक्षाचे पारडे जड असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, मनसे या राजकीय पक्षाचे उमेदवारही सत्ताधारी होण्यासाठी कंबर कसत आहेत. दुसरीकडे सेना- राष्ट्रवादी युती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देऊन बारा जागेवर शिवसेना उमेदवार लढवणार आहे.

शिवसेना नेते उमेश गावंड यांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. ओबीसी राजकीय आरक्षण हटवल्याने वार्ड क्रमांक दोन रिक्त राहिला आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाला जनता आपला कौल देते, हे पाहणे गरजेचे आहे.

Exit mobile version