45 लाखांच्या गांजासह वाहन जप्त

। पनवेल । वार्ताहर।

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेल विभागाने पनवेलजवळील तक्का येथे आज 2 दोन आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून जवळपास 45 लाखाच्या गांजासह गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे.

पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग समोर, तळोजे पाचनंद, से. नं. 40, तळोजे येथे 2 दिवसापूर्वी 1 कोटी रूपये किमंतीचा जास्त किमंतीचा गांजा हा अंमली पदार्थाचा मोठासाठा व एक चारचाकी एक्सयुव्ही 500 वाहन जप्त केले होते. व दोन आरोपींना अटक केलेली होती. सदर आरोपींना कार्यालयात चौकशीकामी आणले असता आरोपी परवेझ शेख याच्या मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन आज सायंकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान ईनोव्हा गाडीने येत आहे असे बोलला.

सदर इसमाशी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सुध्दा ते अंकलच आहेत असे बोलून त्याला तु सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई-पुणे रोडवर पंचमुखी मारूती मंदिरसमोर ये असे बोलले. त्यानुसार हनोझ होशी इंगीनीर (इंजिनियर) रा. लोणावळा, व दिवा उंबरे यांना चारचाकी वाहन ईनोव्हाने ते मालासह तक्का पनवेल येथे आले व अलगदपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापळ्यात अडकले. सदर आरोपींच्या ताब्यातून 135 किलो गांजासह एक चारचाकी ईनोव्हा वाहन असा एकुण 45,75,000 रूपये किमंतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

Exit mobile version