लोक न्यायालयात 452 प्रकरणे निकाली

| कर्जत । वार्ताहर ।

कर्जत येथील दिवाणी न्यायालयामध्ये लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयमध्ये तडजोडीसाठी एकूण दिवाणी व फौजदारी 219 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 36 प्रकरणे निकाली निघाली तसेच वाद पूर्वप्रकरणे 4222 ठेवण्यात आली होती, त्यापैकी 416 प्रकरणे निकाली निघाली. तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये तडजोडी पोटी एकूण 14,48,565 रुपये इतकी वसुली झाली.

या लोक न्यायालयाचे कामकाज तालुका निधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.आर.शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. सदरील लोक न्यायालय मध्ये पॅनल अ‍ॅड म्हणून ज्येेष्ठ वकील अ‍ॅड.राजेंद्र निगुडकर यांनी काम पाहिले. पॅनलला विशेष सहकार्य कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.अरुण नायक तसेच इतर सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी अ‍ॅड.अजय मेढी, अ‍ॅड.दीपक गायकवाड, अ‍ॅड.सनी डीमेलो, अ‍ॅड.मोतीलाल ओसवाल या जेष्ठ वकिलांसह अ‍ॅड.प्रदीप सुर्वे, अ‍ॅड.दीपक पादिर, अ‍ॅड.समीर लाड, अ‍ॅड.महेश घारे, अ‍ॅड.मनोज क्षीरसागर, अ‍ॅड. रविकर गायकवाड, अ‍ॅड. निलेश पादिर, अ‍ॅड.प्रविण खडे, अ‍ॅड.अक्षय भोपतराव, अ‍ॅड.संदीप घरत, अ‍ॅड.पूजा सुर्वे,अ‍ॅड. हिना शेख, अ‍ॅड. रुचिरा दगडे, अ‍ॅड.हिनल ओसवाल, अ‍ॅड. वर्षा कोचुरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version