48वी कुमार/कुमारी राज्य कबड्डी स्पर्धा; यजमान पुणे मुलांचे आव्हान संपुष्टात

। पुणे । प्रतिनिधी ।
बालेवाडी पुणे येथील क्रीडांगणावर पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस, संदिप बालवडकर स्पोर्टस फाऊंडेशन, चेतक स्पोर्टस् फाऊंडेशन व धर्मवीर कबड्डी संघ यांच्या संयुक्त विद्यवाने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त 48 वी कुमार गट मुले व मुली अजिंक्यपद निवड चाचणीत उपउपात्य पुर्व बाद फेरीच्या झालेल्या सामन्यात मुलांमध्ये रत्नागिरी संघाने पुणे संघावर 27-22 असा विजय मिळविल्याने पुण्याला स्पर्धेबाहेर पडावे लागले. मध्यंतराला रत्नागिरी संघ 10-11 असा एक गुण फरकाने पिछाडीवर होता. रत्नागिरीच्या शुभम पाटील याने केलेल्या चढाया व वेद पाटील याने केलेल्या पकडींच्या जोरावर रत्नागिरी संघाने विजय मिळविला. पुणे संघाच्या अजित चौहान याने चौफेर चढाया करीत चांगली टक्कर दिली व राहूल वाघमारे याने ही काही चांगल्या पकडी घेतल्या.
कुमार गटात बाद फेरीत पुणे, रायगड, परभणी, मुंबई उपनगर, रत्नागिरी, अहमदनगर तर कुमारी पुणे, ठाणे, रायगड, नासिक, औरंगाबाद, नांदेड, सांगली, रत्नागिरी, मुंबई उपनगर, अहमदनगर या संघानी बाद फेरीत प्रवेश केला.
अ गटात विजयी रायगड, उपविजयी परभणी, ब गट विजयी मुंबई उपनगर, उपविजयी रत्नागिरी, क गट विजयी पालघर, उपविजयी लातुर, ड गट विजयी सांगली, उपविजयी कोल्हापूर, इ- गट विजयी बीड, उपविजयी नंदूरबार, फ गट विजयी अहमदनगर, उपविजयी पुणे.

Exit mobile version