| मुंबई | प्रतिनिधी |
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4640 घरे आणि 14 भूखंडासाठी सोडतीच्या स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध झाली. यानुसार एकूण 49 हजार 174 अर्ज यामध्ये पात्र ठरले आहेत. बुधवार 10 मे रोजी ठाण्यात सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीसाठी 8 मार्चपासून नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली होती. स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार 49 हजार 174 अर्ज सोडत प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. यानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी 351 अर्ज, 20 टक्के सर्वसमावेश योजनेसाठी 46 हजार 16 अर्ज, म्हाडाच्या घरांसाठी 2 हजार 438 अर्ज तर प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी 369 अर्ज पात्र ठरले आहेत.
केंद्र सरकारच्या ङ्गपंतप्रधान आवास योजनाङ्घ (पीएमएवाय) अंतर्गत बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या प्रकल्पातील परवडणार्या घरांना सर्वसामान्यांची पसंती मिळत नसल्याचे दिसत आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2023च्या सोडतीतील योजनेच्या 984 घरांसाठी केवळ 352 अर्ज प्राप्त झाले तर त्यापैकी एक अर्ज अपात्र ठरल्याने 351 अर्ज पात्र झाले आहेत.
म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीत विरार, बोळींजमधील 2,048 घरांचा समावेश असून, ही घरे ङ्गप्रथम येणार्यास प्रथम प्राधान्यफ योजनेद्वारे विकली जात आहेत. मात्र या घरांना इच्छुक किंवा अर्जदारांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. 2,048 घरांसाठी केवळ 369 अर्ज सादर झाले आहेत.