। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादींच्या राहत्या घरातून तब्बल 49 हजारांचा दस्तऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कर्जत येथे दि.8 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने फिर्यादी रा.तुलसी आंगन सोसायटी बिल्डींग नं.09, रुम नं.04, कचेरी रोड, कर्जत यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक चावीने उघडुन डी.सी.एल.आर.कॅमेरा, जॉनी वॉकर स्कॉच, साउंड सिस्टीमचा स्पीकर असा एकूण 49 हजार रुपये किमतीच्या वस्तु फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीचे हेतूने स्व:ताचे फायदयाकरीता फिर्यादी चोरुन नेल्या व पुन्हा लॉक बंद केले. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सफौ/श्री.जगताप हे करीत आहेत.