महाडमधील 49 गावांना दरडीचा धोका


प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता
। महाड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रामध्ये वेळेमध्ये मान्सुन सुरु झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असुन नागरिकांना सावध राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने तालुक्यांमध्ये काही गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. महसुल विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यामध्ये 49 गावांना दरडी पासुन धोका असल्याने या गावांना सावधानतेच्या सुचना महसुल विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

महाड तालुक्यांतील दरड गावांमध्ये नडगाव येथील काळभैरवनाथ नगर, करंजखोल, टोळ बु,दासगाव, वीर, वीर मराठवाडी, शेलटोली, येरखोले, नाणेमाची, नाणेवाडी, वाकी बु, वाळण बु, माझेरी, मोहोत, पारमाची, आंबेनळी, (आंबेशिवथर), चांढचे खुर्द, पुनाडेवाडी, पाचाडवाडी, हेटकर कोंड, (सांदोशी), मांडले, तळोशी, पिंपळकोंड, आंब्याचा कोंड (मुमुर्शी), मुमुर्शी गावठण, मुमुर्शी बौद्धवाडी, मोरवाडी (शिंगरकोंड), रावतळी (मानेची धार), कोंडीवते, जंगमवाडी (कोथेरी ), कोंडीवते नवीन, पातेरीवाडी (आंबवली बु.), कुर्ले दंडवाडी, कोसबी, गोठे बुदू्रक, वामने, मुठवली, सव, चोचिंदे, चोचिंदेकोंड, सोमघर, रोहण, आदिस्ते, खैरे, वलंग, चिंभावे, बौद्धवाडी, वराठी बौद्धवाडी, लोअर तुडील, जुई बुद्रुक आणि वुैंबळे या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

तालुक्यातील 49 दरडगस्त गावांना महसुल विभागाकडून सावधानतेच्या सुचना देण्यात आल्या असुन तलाठी कर्मचार्‍यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणत्या गावांतुन नागरिकानां स्थलांतर करणे आवश्यक आहे हे निश्‍चित करण्यात येईल. वरील बहूतांशी गावांना दरडी पासुन धोका असल्याने या गावांमध्ये शासनाकडून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version