पाच लाखाची फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल परिसरामध्ये स्वस्तामध्ये घर देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. चेंबूरमधील महिलेलाही घोट गावातील चाळीमध्ये घर देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. चेंबूरमध्ये राहणार्‍या मीना गवारे यांनी ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून मानसरोवर येथे कार्यालय असलेल्या उन्नीथन नावाच्या व्यक्तीशी घर खरेदी करण्यासाठी व्यवहार केला होता. घर मिळाले नाही व पैसेही परत दिले जात नसल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version