इर्शाळवाडी दुर्घटना: मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगडमधील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. या दरडीच्या मलब्याखाली 40 घरे दबली गेली आहेत. आतापर्यंत घटनास्थळावरून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही सांगितले.

”गावातील 15 ते 17 घरं मलब्याखाली दबली गेली आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ व स्थानिक बचाव दल घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. पण या भागात जेसीबी पोकलन येऊ शकत नसल्याने त्यामुळे फक्त मानवी स्तरावर बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टर आम्ही तैनात ठेवले आहेत”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


”दरडग्रस्त यादीत हे गाव नव्हतं. दरडग्रस्त गावातील लोकांना आपण स्थलांतरीत करतो. पण हे गाव नसल्याने आपण येथील लोकांना स्थलांतरीत केलेले नव्हते. हे गाव त्या यादीत का नव्हते, कुणाची चूक या सर्व गोष्टीची नंतर चौकशी होईलच. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देऊ ” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version