पैशांच्या आमिषाने तोतया साधुचा पाच लाखांचा गंडा

| नेरळ | प्रतिनिधी |
पैशाच्या हव्यासापोटी कर्जतच्या एका उद्योजकाला पाच लाखांचा गंडा घालून एक साधू गायब होण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्जत शहरातील हॉटेल फूड कोर्ट येथे पैशाचा पाऊस पाडण्यासाठी खोपोली येथील एका तरुणाने तब्बल पाच लाखाची रक्कम नाव गाव माहिती नसलेल्या भोंदू महाराज आणि त्याच्या चार साथीदार यांना दिली होती. मागील एक वर्षात हा व्यवहार पूर्ण झाला असून त्याबाबत आता कर्जत पोलीस येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

खोपोली येथील शिळफाटा भागात बिल्डिंग मटेरियल सप्लाय चा व्यवसाय करणारी एका तरुणाने पैशांच्या हव्यासापोटी पैशाचा पाऊस पडणार्‍या भोंदू महाराजाला जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत तब्बल पाच लाखाची रक्कम दिली. हा सर्व व्यवहार कर्जत येथील हॉटेल फूड कोर्ट येथे झाला होता. शिळफाटा येथील तरुणाने सदर रक्कम सज्जन महाराज, त्याचा साथीदार सुरज आणि आणि तीन अनोळखी व्यक्ती यांच्याकडे दिले आहेत. वर्षभरात एकदाही पैशाचा पाऊस पडला नाही आणि त्याचे पैसे तीनपट म्हणजे सज्जन महाराज आणि त्याच्या टोळीला दिलेले पाच लाखाचे पंधरा लाख काही झाले नाही आणि आपण फसलो आहोत याची खात्री झाल्यानंतर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे.

कर्जत पोलीस ठाणे येथे सज्जन महाराज,त्युच साथीदार सूरज तसेच अन्य तीन अनोळखी व्यक्ती या सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.त्या तिघांवर खोपोली शिळफाटा येथील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी भादवी कलम 406,417,420,34 नुसार गुन्हा 35/2023 नुसार पोलीस हवालदार समीर भोईर अधिक तपास करीत आहेत. माहिती घेण्यासाठी प्रभारी पोलीस अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्यासह हॉटेल कर्जत फूड कोर्टची पाहणी केली आहे.

Exit mobile version