पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील गेली अनेक वर्ष रखडलेला पाणी प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागणार आहे. यासाठी खा. सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी (दि.26 मेः रोजी शहापाडा धरण, वाशी, शिर्कि याठिकाणी खासदार सुनील तटकरे यांनी पाहणी केली. व संबंधित अधिकारी व ग्रामस्त यांच्याशी चर्चा विनिमय करून सर्वांच्या जिव्हाळ्याचा व अत्यंत महत्वपूर्ण असलेला पाणी प्रश्न लवकरच सोडविला जाईल असे अभिवचन यावेळी देण्यात आले
view More : पनवेल जिल्हा शेकाप कार्याध्यक्षपदी महादेव वाघमारे .http://view more http://krushival.in/raigad/politics/mahadev-waghmare-as-panvel-district-pwp-working-president
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सुधीर वेंगुर्लेकर,राष्ट्रवादी काँग्रेस पेण तालुकाध्यक्ष दयानंद भगत, महिला तालुका अध्यक्ष चैताली पाटील, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, परशुराम मोकल ,प्रमोद मोरे, आदींसह सरपंच, अधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपल्या पाण्याच्या समस्यांचा पाढा खासदार सुनील तटकरे याच्या पुढे मांडला. पाण्याचा प्रश्न हा वर्षभरास सोडविला जाईल असे आश्वासन तटकरे यांनी यावेळी दिले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत आता 30 कोटी खर्च करून हेटवणे धरणातून 9 दशलक्ष घन मीटर पाणी शहापाडा धरणात आणून सोडले जाणार आहे. शहापाडा धरणातून पाईपद्वारे हे पाणी 50 गावांना पुरविले जाणार आहे. यासाठी तातडीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून 30 कोटी खर्च करून हेटवणे धरणातून शहापाडा धरणात पाणी आणून ते खारेपाट गावातील 50 गावांना पाईपद्वारे पोहचविण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न वर्षभरात संपणार
खासदार सुनील तटकरे