संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 50.31% टक्के मतदान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सकाळी सात ते पाच या वेळेत रायगड लोकसभा मतदार संघात 50.31% टक्के मतदान झाले. अलिबाग, विधानसभा मतदार संघात 52.23 टक्के श्रीवर्धन मतदार संघात 49.48 टक्के, पेण मतदार संघात 51 टक्के, महाड मतदार संघात 45.6 टक्के व गुहागर मतदार संघात 53.77 टक्के व दापोली मतदार संघात 50.12 टक्के मतदान झाले. दहा तासाच्या कालावधीत गुहागर दापोली व अलिबाग या मतदार संघात अधिक तर महाडमध्ये कमी मतदान झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.

Exit mobile version