आ.जयंत पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा
। मुंबई । प्रतिनिधी ।
कोकणातील मच्छिमारांच्या विविध समस्यांबाबत विधिमंडळात आक्रमकपणे भूमिका मांडणार्या शेकाप आ.जयंत पाटील यांच्या मागण्यांची दखल अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे दिसून आले. या अर्थसंकल्पात प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण प्रकल्पामुळे विस्थापित वा तात्पुरत्या प्रभावित मासेमार कुटुंबांना मदत देण्यासाठी प्रकल्पाच्या 2 टक्के वा 50 कोटी रुपयांचा मत्स्यविकास कोष निर्माण करण्यात आला आहे. डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या 120 अश्वशक्तीची अट काढली, त्यामुळे 85 हजार अधिकच्या मासेमारांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी 269 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . पारंपारिक मासेमारी करणार्या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखांचा विमा देणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.