लग्न झालं रद्द, कल्याणमध्ये खळबळ
| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणमधील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीमध्ये हळदी सभारंभात जेवण केल्याने 40 ते 50 लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. पाहुण्यांना विषबाधा झाल्यानं लग्नच रद्द करण्यात आले आहे. याप्रकरणी वधूसह आई, बहीण यांनादेखील ही विषबाधा झाली आहे. या घटनेमुळं वधूला जबर मानसिक धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीमध्ये हळदी सभारंभाचा कार्यक्रमक आयोजीत केला होता. या कार्यक्रमात जेवण केल्यानं 40 ते 50 लोकांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये वधूदेखील विषबाधा झाली आहे. या घटनेमुळं लग्न रद्द करण्यात आलं आहे. संबंधित केटर्सवर गुन्हा दाखल करण्यासाठी वधूचे वडील पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. कल्याण खडकपाडा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ज्या खाण्यातून विषबाधा झाली आहे, त्या अन्नाचे नमुने नसल्याने पोलीस अधिक चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे.






