झाड तोडल्यास 50 हजार दंड

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.7) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकित 12 विविध निर्णय घेण्यात आले असून जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभागासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, यापुढे झाड तोडल्यास 50 हजार रुपयांच दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी 1 हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. त्यामुळे, यापुढे झाडांची कत्तल करताना किंवा झाडे तोडताना होणार्‍या परिणामाचा विचार करुनच पाऊल उचलायला हवं. विना परवानगी जंगल तोडणार्‍यांसाठी वन विभागाने हे पाऊल उचललं आहे. या दंडाची तरतूद करणारा शासन निर्णय लवकरच पारीत होईल.

Exit mobile version