जिल्ह्यासाठी 501 कोटींचा प्रारुप आराखडा

जिल्हा नियोजन समिती बैठकीत मान्यता

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 2024-25 साठी 432 कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेंतर्गत 28 कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेंतर्गत 41 कोटी 61 लाख रुपये अशा एकूण 501 कोटी 61 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.

सन 2024-25 साठी सर्व यंत्रणांकडून आलेल्या मागणीनुसार प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. नियोजन विभागाने रायगड जिल्ह्याला दिलेल्या वित्तीय मर्यादेनुसार जिल्हा नियोजन समितीने 501.61 कोटीच्या आराखड्यास मान्यता दिली. गेल्यावर्षी 360 कोटींचा असणारा आराखडा सन 2024-25 साठी 432 कोटींचा केला असून, या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या कल्याणसाठी प्रभावी योजना राबविण्यात येणार आहे. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी जिल्हा विकासासाठी लोकप्रतिनिधींनी दिलेले प्रस्ताव, सूचना आणि शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश सामंत यांनी दिले. विकासात्मक कामाला शासनाने अतिरिक्त 72 कोटी निधी वाढवून दिला आहे.

Exit mobile version