सायबर चोरट्याकडून 52 लाखांची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

चीनमधील कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून एका सायबर चोरट्याने तळोजा एम.आय.डी.सी.तील फ्लुरो इंजिनियरींग प्रा.लि. या कंपनीला बनावट ईमेलद्वारे संपर्क साधून या कंपनीला फॅक्टरी अ‍ॅटमेशनसाठी लागणारे पार्ट्स पाठविण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून तब्बल 52 लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आय.टी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

Exit mobile version