दोन राज्यांत 52 विद्यार्थी कोरोनाबाधित

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढलेला असताना दुसरीकडे शाळांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील शाळांमध्ये एकूण 52 विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील सरकारी शाळेत 23 विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बिलासपूरमधील सरकारी हायस्कूल देलागमध्ये एकाच वेळी अनेक मुलांना संसर्ग झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पश्‍चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील एका शाळेतील 29 मुले करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने येथे खळबळ उडाली आहे. शाळेतील उर्वरित विद्यार्थी आणि शिक्षकांचीही करोना तपासणी केली जात आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कल्याणी भागातील नवोदय केंद्रीय विद्यालयातील सर्व बाधित मुलांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Exit mobile version