५२ वर्षीय इसम बेपत्ता

। पनवेल । वार्ताहर ।
राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम उलव्याच्या दिशेने निघून गेला तो अद्याप घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. लक्ष्मण विठ्ठल पाटील (52), उंची साडेपाच फूट, रंग सावळा, डोक्याचे केस काळे-पांढरे, अंगाने मध्यम असून, त्याच्या अंगात पांढर्‍या फुल बाह्याचा शर्ट व काळी फुल पॅन्ट घातलेली आहे, तसेच पायात पांढरी साधी चप्पल आहे. त्यांना मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पो.ना. नितीन आखाडे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version