| पेण | प्रतिनिधी |
शिक्षण विभाग पेण पंचायत समिती आणि एन.व्ही.जी एज्युव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने कोनायसन्स शाळा पेण येथे गट विकास अधिकारी गजानन लेंडी आणि एन.व्ही.जी.एज्युव्हेंचर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनिष वनगे यांच्या हस्ते व गणेश सिंघ ठाकूर प्रशासकीय अधिकारी पेण नगरपालिका, डॉ. सोनाली वनगे, ज्योती गुरव, नायब तहसिलदार नितीन परदेशी, प्रसाद कालेकर, व पेण तालुक्यातील केंद्र शिक्षक यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर गटशिक्षण अधिकारी यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यानंतर विज्ञान प्रदर्शनाच्या खोल्यांचे फित कापून औपचारिक उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते केले. या विज्ञान प्रतिकृतींमध्ये शेती, कचऱ्याचा विल्हेवाट, गणिती मॉडल, मनोरंजनातून गणित, या विषयाला धरून प्रतिकृती होत्या. प्राथमिक विभागात एकूण 48 प्रतिकृती त्यामध्ये 3 प्रतिकृत ह्या आदिवासी विभागाच्या होत्या तर माध्यमिक विभागामध्ये 37 प्रतिकृती यामध्ये देखील 3 आदिवासी विभागाच्या प्रतिकृती होत्या. प्राथमिक शिक्षकांच्या 7 प्रतिकृती माध्यमिक शिक्षकांच्या 5 प्रतिकृती अशा एकूण 97 प्रतिकृती या विज्ञान प्रदर्शनामध्ये होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद म्हात्रे यांनी केले. यावेळी काही प्रतिकृतीधारक विद्यार्थी व शिक्षकांनी प्रतिकृतीविषयी माहिती दिली.







