। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 54.9 टक्के मतदान झाले. एकूण 1 लाख 30 हजार 387 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 64 हजार 906 पुरुष आणि 65 हजार 480 महिला मतदारांचा समावेश आहे. सुरुवातीपासूनच महिलांचा मतदानाचा उत्साह अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आला. कर्जत 57.02 टक्के, अलिबाग 57.31 टक्के, माथेरानमध्ये 74.4 टक्के, मुरूडमध्ये 64.6 टक्के, श्रीवर्धनमध्ये 55.55 टक्के, खोपोलीमध्ये 50.35 टक्के, उरणमध्ये 51.05 टक्के, पेणमध्ये 55.96 टक्के, महाडमध्ये 54.79 टक्के व रोहामध्ये 57.59 टक्के मतदान झाले. आठ तासांच्या कालावधीत माथेरान व मूरूडमध्ये 60 टक्केपेक्षा अधिक तर अन्य नगरपरिषदांमध्ये 50 टक्केपेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती आकडेवारीनुसार देण्यात आली.







