| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी सकाळपासून शांततेत मतदान सुरु असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुपारी 3:30 वाजेपर्यंत आठ तासात 57.77 टक्के मतदान झाले. 9 लाख 82 हजार 374 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये चार लाख 91 हजार 402 पुरुष व चार लाख 90 हजार 969 महिला तसेच इतर 3 मतदारांचा समावेश आहे. मतदान करण्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांपेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
जिल्ह्यात पनवेल तालुक्यात 59.13 टक्के, कर्जतमध्ये 63.29 टक्के, खालापूरमध्ये 61.90 टक्के, सुधागडमध्ये 55.25 टक्के, पेणमध्ये 60 टक्के, उरणमध्ये 60.21 टक्के, अलिबागमध्ये 60.35 टक्के, मुरूडमध्ये 59.13 टक्के, रोहामध्ये 55.83 टक्के, तळामध्ये 47.15 टक्के, माणगावमध्ये 52.92 टक्के, म्हसळामध्ये 43.60 टक्के, श्रीवर्धनमध्ये 46.18 टक्के आणि महाडमध्ये 56.42 टक्के, पोलादपूरमध्ये 55.73 टक्के मतदान झाले. या आठ तासात कर्जत, खालापूर, पेण, उरण, अलिबागमध्ये अधिक मतदान झाल्याचे दिसून येत आहे.







