रायगड जिल्ह्यात 599 नवे रुग्ण

जिल्ह्यात सर्वाधिक 123 रुग्ण अलिबाग तालुक्यात
21 रुग्णांचा मृत्यू तर 516 रुग्णांची कोरोनावर मात
जिल्हा प्रशासनाची माहिती

अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात आज बुधवारी 9 जून रोजी कोरोनाच्या 599 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 516 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
 
आज पनवेल शहरात 81, पनवेल ग्रामीणमध्ये 53, अलिबाग तालुक्यात 123, खालापूरमध्ये 38, उरणमध्ये 37, पेणमध्ये 66, महाडमध्ये 45, कर्जतमध्ये 12, रोह्यात 46, मुरुडमध्ये 18, माणगावमध्ये 28, तळामध्ये 13, म्हसळ्यात 8, सुधागडमध्ये 10, पोलादपूरमध्ये 8 तर श्रीवर्धनमध्ये 13 रुग्णांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे.
 
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजार 069 झाली आहे. यापैकी 1 लाख 26 हजार 416 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 267 वर गेला आहे. सद्यस्थितीत 6 हजार 386 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version