घरोघरी 5G सेवेचा संकल्प; अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. यावेळी अर्थमंत्र्यांनी 5G मोबाईल सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली. 2023 पर्यंत देशातील प्रत्येक घरात 5 G सेवा पुरवण्याचा मोदी सरकारचा संकल्प असल्याचे निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

5 G सेवा भक्कम करण्यासाठी इकोस्टिस्टिमची उभारणी करण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात फायबर केबल्सच्या माध्यमातून 5 G सेवेचं जाळे विणण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील छोट्या छोट्या खेड्यांनाही ही सेवा उपलब्ध होईल याचा सरकारने विचार केला आहे, असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version