रायगड जिल्ह्यात 6 रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू , 10 कोरोनामुक्त

13 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरूवार दि. 10 मार्च रोजी कोरोनाच्या 6 नव्या रुग्णांची नोंद झाली असून दुर्दैवाने उपचारादरम्यान आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 13 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गुरूवारी पनवेल महापालिका हद्दीत 3, कर्जत 2 व रोहा 1 असे 6 रुग्ण आढळले. उरण, खालापूर, पनवेल ग्रामीण, पेण, महाड, अलिबाग, मुरुड, माणगाव, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा व पोलादपूर या 13 तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 608 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 751 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 694 वर गेला आहे. सद्यस्थितीत 163 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version