| पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीच्या व्यावसायिकाला महिलेसोबत फेसबुकवर मैत्री करणे महागात पडले असून त्या महिलेने व्यवसायिकाची 60 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. महिलेने व्यवसायिकाला फॉरेक्स व क्रिप्टो करन्सीच्या ट्रेडिंगच्या बहाण्याने 64 लाख 70 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात 4 लाख 46 हजार रुपये परत केले. उरलेल्या 60 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये फेसबुकवर तनिष्का शर्मा नावाच्या महिलेचा मैत्रीचा संदेश आला आणि त्यांच्या संवाद सुरू झाला होता.