BUDGET 2022: 60 लाख नव्या नोकऱ्या देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा!

। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशात येणाऱ्या काळात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीत मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. तब्बल 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी त्यांनी बजेटची ओपनिंग केली. मात्र, यासाठी निधी कसा आणि कुठून आणणार याचा उल्लेख त्यांनी भाषणात तरी केला नाही. मात्र, आगामी पाच राज्यांच्या निवडणुका पाहता या बजेटमध्येही असाच घोषणांचा धडाका राहू शकतो. अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या की, कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. मात्र, तरीरी जीडीपी 9.2 टक्के राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शिवाय आपल्या अर्थसंकल्पात येत्या पंचवीस वर्षांची ब्लू प्रिंट असेल, असा आशावादही त्यांनी केला.

60 लाख नव्या नोकऱ्या
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. विशेषतः या बजेटमधून सामान्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न असेल. येणाऱ्या काळात लवकरच LIC चा IPO बाजारात आणला जाणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. मात्र, या नोकऱ्या कोणत्या क्षेत्रात असतील, त्यांच्यासाठी निधी कसा उपलब्ध असेल, याचा उल्लेख भाषणात नव्हता. कदाचित अर्थसंकल्पात याचा सविस्तर उल्लेख असू शकतो.

Exit mobile version