| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशभरात सध्या कोरोना प्रादुर्भाव सध्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.63 टक्क्यांवर, तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 31,194 वर पोहोचली आहे.
कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता, सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोरोना लसीकरणासंदर्भात आढावा घेतला.