भीषण! ब्राझीलमध्ये विमान कोसळून 62 जण ठार

। ब्राझील । वृत्तसंस्था ।

ब्राझीलमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. या अपघातात 58 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स अशा एकूण 62 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमधील साओ पाउलो या ठिकाणी शुक्रवारी ही दुर्घटना घडली. हे विमान एटीआर-27 या नावाचे असून लिहॉन्स एरियाज या एअरलाईन्सचे होते. तर, पारना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाउलोमधील ग्वारुलहोस या ठिकाणी जात होते. या विमानातून 4 क्रू मेंबर्ससह 58 प्रवासी प्रवास करत असून साओ पाउलो या ठिकाणी असणाऱ्या ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरणार होते. विमान कोसळण्याआधी हवेत गिरक्या घेत होते. त्यानंतर विमान एका घरावर कोसळले. विमान कोसळल्यानंतर विमानाने पेट घेतला. यात विमानातील 58 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स अशा 62 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 7 पथके घटनास्थळी झाली असून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

Exit mobile version