। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
62 वर्षीय मंगल लक्ष्मण शिंगारे या विचुंबे येथील घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याआहेत. मात्र त्या घरी परत न आल्याने त्या हरवल्याअसल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या महिलेची उंची चार फूट, पाच इंच, रंग काळा सावळा, चेहरा चौकोनी आहे. केस काळे आणि पांढरे बारीक केलेले आहेत. समोरील दात अर्धवट तुटलेला असून डाव्या हातावर फुलांचे चित्र गोंदलेले आहे. या महिलेला मराठी भाषा बोलता येते. गेल्या काही दिवसांपासून या महिलेचे स्वास्थ्य बिघडलेले आहे. या महिलेबाबत अधिक माहिती असल्यास महिला पोलीस हवालदार एस. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधावा.







