रायगडात आज मंगळवारी 633 रुग्णांची कोरोनावर मात


दिवसभरात
561 नवे रुग्ण; 16 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाची माहिती
|अलिबाग ।

रायगड जिल्ह्यात आज मंगळवारी (8 जून) कोरोनाच्या 561 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 633 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आज पनवेल शहरात 95, पनवेल ग्रामीणमध्ये 54, अलिबाग तालुक्यात 86, खालापूरमध्ये 21, उरणमध्ये 27, पेणमध्ये 55, महाडमध्ये 33, कर्जतमध्ये 16, रोह्यात 58, मुरुडमध्ये 13, माणगावमध्ये 44, तळामध्ये 9, म्हसळ्यात 3, सुधागडमध्ये 11, पोलादपूरमध्ये 12, श्रीवर्धनमध्ये 24 रुग्णांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे.
 
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 470 झाली आहे. यापैकी 1 लाख 25 हजार 900 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 246 वर गेला आहे. सद्यस्थितीत 6 हजार 324 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version