रायगड जिल्ह्यात 69 रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 15 फेबु्रवारी रोजी कोरोनाच्या 69 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पाच तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 165 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 39, पनवेल ग्रामीण 4, खालापूर 3, उरण 1, कर्जत 2, पेण 7, अलिबाग 8, माणगाव 2, रोहा 1, श्रीवर्धन 1, म्हसळा 1 असे 69 रुग्ण आढळले. मुरुड, सुधागड, तळा, महाड व पोलादपूर या पाच तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 106 झाली आहे. यापैकी 2 लाख 08 हजार 810 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 682 वर गेला आहे. सद्यस्थितीत 614 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version