। ग्वालियार । वृत्तसंस्था ।
ग्वालियारमधून उत्तरप्रदेशमधील बरेली कडे जाणार्या बसचा कंटेनरला धडकून भिषण अपघात झाला. यामध्ये बसमधील 7 लोकांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महीलेचा सामावेश असून हा अपघात भिंड जिल्ह्यातील गोहद येथे झाला.
गोहाद पोलीस ठाण्याचे ओम प्रकाश मिश्रा यांनी सांगितले की ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. धडकेनंतर कंटेनर पलटी होऊन ड्रायव्हर गंभीर जखमी झाला तसेच अपघातानंतर बसचा ड्रायव्हर पळून गेला आहे.