रायगड जिल्ह्यात 7 रुग्ण; शुन्य मृत्यू नोंद, 8 कोरोनामुक्त

13 तालुक्यात एकही नवीन रूग्ण नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात रविवार दि. 6 मार्च रोजी कोरोनाच्या 7 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज देखील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. 13 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 8 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रविवारी पनवेल महापालिका हद्दीत 4, पनवेल ग्रामीण 1, श्रीवर्धन 2 असे 7 रुग्ण आढळले. उरण, कर्जत, खालापूर, अलिबाग, रोहा, पेण, मुरुड, माणगाव, म्हसळा , सुधागड, तळा, महाड व पोलादपूर या 13 तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 587 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 698 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा सुदैवाने 4 हजार 693 वरच थांबला आहे. सद्यस्थितीत 196 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version