खोपोली क्रांतीनगर येथील भयंकर दुर्घटना; शोध कार्य सुरू .
I खोपोली I संतोषी म्हात्रे I
सोमवारच्या मुसळधार पावसाने खोपोलीत संध्याकाळी भयंकर दुर्घटना घडली असून शास्त्रीनगर – विणानगर भागातून वाहत असलेल्या नाला दोन दिवस दुथळी भरून वाहत आहे. नाल्याला लागून असलेल्या क्रांतीनगर भागातील बहीण भाऊ पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडले असता ते उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत . काही प्रथमदर्शनी नागरिकांच्या मते हे दोघे जण नाल्याच्या पाणी प्रवाहात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. निलम श्रीकांत हचंलीकर वय 7 (बहीण), बाबु श्रीकांत हचंलीकर वय5 (भाऊ) अशी क्रांतीनगर येथील वाहुन गेलेल्यांची नावे आहेत.
सदर भयंकर बाब समोर आल्यावर क्रांतीनगर मधील नागरिक, खोपोली पोलीस, नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान, खोपोली पालिका आपत्कालीन व्यवस्था, खोपोली अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय टीमचे सदस्य वाहून गेलेल्या दोन्ही बहीण भावाचा शोध कार्यात लागली असून मुसळधार पाऊस , पाताळगंगा नदीला आलेला मोठा पूर यामुळे शोध कार्य कठीण बनले आहे .